Ad will apear here
Next
‘बँक ऑफ इंडिया’ने जाहीर केला विशेष व्याजदर
मुंबई : बँक ऑफ इंडियाने (बीओआय) चांगला सिबिल स्कोअर असलेल्या ग्राहकांना ३० लाख रुपये वा त्याहून अधिक रकमेच्या गृहकर्जावर विशेष व्याजदर देण्याचे जाहीर केले आहे.

या निर्णयानुसार, ७६०व त्याहून अधिक स्कोअर असलेल्या ग्राहकांना बँक मिनिमम होम लोन इंटरेस्ट रेटनुसार (एमसीएलआर) व्याजदर आकारणार आहे. ‘एमसीएलआर’ म्हणजे किमान व्याजदर, ज्यापेक्षा कमी दराने बँक कर्जे देऊ शकत नाही. ग्राहकाचा सिबिल स्कोअर म्हणजे क्रेडीट इन्फर्मेशन रिपोर्टचा (सीआयआर) तीन आकडी सारांश असतो. त्यामध्ये पूर्वीचे क्रेडीटविषयक वर्तन व परतफेडीची पार्श्वभूमी यांचा सारांश असतो आणि ही आकडेवारी ३०० ते ९०० या दरम्यान असते. हा स्कोअर जितका अधिक असतो तितकी कर्ज मंजूर होण्याची शक्यता अधिक असते. बहुतेक बँका कर्ज मंजूर करण्यापूर्वी ग्राहकाचा सिबिल स्कोअर व रिपोर्ट तपासतात.

‘बँक ऑफ इंडिया’ने नमूद केले, ‘आम्ही ग्राहकांना दर्जेदार व नाविन्यपूर्ण उत्पादने व सेवा देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो व त्यामुळे ग्राहकांना गरज असेल तेव्हा कर्जसुविधा मिळण्यासाठी मदत होते. चांगला क्रेडीट स्कोअर राखण्याची शिस्त पाळणाऱ्या ग्राहकांना बक्षीस द्यायला हवे. यामुळे आर्थिक पार्श्वभूमी चांगली राखण्याची गरज व महत्त्व यामुळे अधोरेखित होईल. चांगला क्रेडीट स्कोअर असलेल्या गृहकर्ज अर्जदारांना चांगला व्याजदर देऊन बक्षीस देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे व यामुळे त्यांचे घर खरेदी करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येईल.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZVQBO
Similar Posts
‘कमी पाऊस होऊनही शेतीतील गुंतवणुकीमुळे उत्पादकता वाढली’ मुंबई : राज्यात गेल्या वर्षी पाऊस कमी होऊनही उत्पादकता ११५ लाख मेट्रिक टन झाली. शेतीतील गेल्या साडेचार वर्षांतील गुंतवणूक आणि जलसंधारणाच्या कामांचे हे यश आहे. या वर्षीच्या खरीप हंगामासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक बि-बियाणे आणि खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसा पीक कर्ज पुरवठा करण्याच्या सूचना बँकांना केल्या आहेत
नाशिकमध्ये गझल लेखन कार्यशाळा नाशिक : मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नाशिक येथील विभागीय केंद्रातर्फे शनिवारी, २७ मे रोजी गझल लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती येथील नितीन देशमुख, तसेच अरुण सोनवणे हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेसाठी ३०० रुपये शुल्क आहे. इच्छुकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा,
‘देशाच्या सर्वांगीण विकासाबाबत अशक्य ते शक्य झाले’ मुंबई : ‘गेल्या पाच वर्षांच्या भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकारच्या कार्यकाळात देशाच्या सर्वांगीण विकासाबाबत अशक्य ते शक्य झाले आहे’, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. २८ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी १२.३० ते दोन या दीड तासाच्या वेळेत संपूर्ण देशभरातील एक कोटीहून अधिक ‘भाजप’ हितचिंतक व कार्यकर्त्यांशी
मुंबईत घर घेण्याचे स्वप्न होणार साकार मुंबई : उच्च मध्यमवर्गीय नागरिकांना मुंबईत घर घेण्याचे स्वप्न साकार करण्याची संधी चालून आली आहे. बांधकाम व्यवसायातील विश्वासाचे नाव असलेल्या ‘धनलक्ष्मी बिल्डर अँड डेव्हलपर’ यांनी मुंबई उपनगर, मुलुंड (पूर्व) येथे‘केशव निवास’ या नव्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. ठाणे, कांदिवली, मालाड, नवी मुंबई येथील गृहप्रकल्पांना

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language